(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar on Badlapur Crime : बदलापूर प्रकरणावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया..
Badlapur School Crime Case : बदलापूर : दोन चिमुकल्या मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये खळबळ उडाली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी रेल्वे ट्रॅक रोखून धरला. शाळेत घुसून शाळेची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलन मोडीत काढलं. सध्या बदलापुरात तणावपूर्व शांतत आहे. बदलापुरात इंटरनेट बंद करण्यात आलं असून अद्याप जमावबंदी लागू आहे. बदलापुरातील तीव्र आंदोलनाची दखल जवळपास संपूर्ण देशानं घेतली. नराधमाला फाशी द्या, या एकाच मागणीसाठी सर्वसामान्य रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच आता या घटनेत 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर, पोलिसांनी 40 हून अधिक जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलं आहे.
बदलापुरात (Badlapur News) मंगळवारी झालेल्या तीव्र आंदोलनानंतर आज तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. बदलापुरात इंटरनेट बंद ठेवण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात आंदोलन करणाऱ्या सुमारे 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी 40 हून अधिक जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येत असल्यातं ठाणे पोलिसांनी सांगितलं. तसेच, आंदोलन झाल्यानंतर आज रेल्वे वाहतुकीबाबत बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, परिस्थिती सामान्य आहे. रेल्वेची वाहतूकही सामान्य आहे. आता कोणतंही कलम लावलेलं नाही. दरम्यान, अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा काही दिवस बंद राहणार असल्याचं मात्र त्यांनी स्पष्ट केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट रोजी शाळेच्या स्वच्छतागृहात बालवाडीच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. ही घटना 16 ऑगस्ट रोजी एका मुलीनं आपल्या पालकांना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. आरोपी अक्षय शिंदे याला 17 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.