Ajit Pawar Welcome Dindori : अजित पवारांची नाशिकच्या दिंडोरीत जंगी स्वागत
Ajit Pawar Welcome Dindori : अजित पवारांची नाशिकच्या दिंडोरीत जंगी स्वागत
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election) वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्या सामना पाहायला मिळणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप जागावाटप निश्चित झाले नाही. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबतचा (Mahayuti Seat Sharing) फॉर्म्युलाच 'एएनआय'शी बोलताना सांगून टाकला आहे. यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) कार्यक्रम जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच राज्यात निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू होईल. साधारण 20 सप्टेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता अजित पवार यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.