Ajit Pawar on Sharad Pawar : शरद पवारांच्या विधानाबद्दल सवाल, अजित पवार म्हणाले नो कॉमेंट्स
Ajit Pawar on Sharad Pawar : शरद पवारांच्या विधानाबद्दल सवाल, अजित पवार म्हणाले नो कॉमेंट्स
पुणे : सध्या राजकारणात सगळीकडे राष्ट्रवादीच्या फुटीची (Ajit Pawar) चर्चा सुरु आहे. अजित पवार आमचेच नेते आहेत, असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालंय. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. नो कॉमेंट्स एवढंच अजितदादा म्हणाले. 'आरोप-प्रत्यारोपांना महत्त्व न देता कामानं उत्तरं द्यायचं ठरवलंय, असे अजित पवार म्हणाले. सत्तांतर झालं त्याला बरेच दिवस झाले. त्यानंतर अमित शाहांच्या उपस्थित कार्यक्रमात मी आलो होतो. पण पिंपरी चिंचवडचे स्थानिक पदाधिकारी म्हणाले, दादा तुम्ही लवकर या, म्हणून आज आलो. मला विकास कामांमध्ये लक्ष घालायला आणि विकास करायला मला आवडतं. ते माझं पॅशन आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.