(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar Baramati Special Report : अजित पवारांनी केलेली चूक, थोरले पवार करताहेत?
Ajit Pawar Baramati Special Report : अजित पवारांनी केलेली चूक, थोरले पवार करताहेत?
आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) आणि महायुतीकडून (Mhayuti) जागावाटपाचा तिढा सोडवला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या यादीत 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मोर्शीमधून देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) तर भोर मतदारसंघातून शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अजित पवार गटाची चौथी यादी जाहीर करण्यात आली असून चौथ्या यादीत 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मोर्शीमधून देवेंद्र भुयार यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र भुयार हे अपक्ष आमदार असताना त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. आता भुयार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आहेत. तर, दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भोर मतदारसंघातून शंकर मांडेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.