(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chalisgaon Flood Update : चाळीसगावात पुरानंतर रोगराईनं डोकं वर काढलं, पूरग्रस्त भागात साथीचे आजार
Chalisgaon : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात पुराचं पाणी ओसरल्यानंतर रोगराईनं डोकं वर काढलंय. तालुक्याच्या 15 गावांना पुराच्या पाण्याने वेढलं होत. पूर ओसरताच जनजीवन हळूहळू पूर्व पदावर येतय, मात्र नागरिक साथीच्या आजाराने हैराण झालेत.
Chalisgaon Rain Update : जळगावातील चाळीसगाव तालुक्यात पावसामुळं हाहाकार माजला आहे. तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जवळपास 800 जनावरं या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पाच ते सात लोकंही वाहून गेल्याची भिती आहे. अशातच आता औरंगाबाद-धुळे महामार्ग कन्नड चाळीसगाव घाटातील भयानक दृश्य समोर आली आहेत. या घाटात दरड कोसळल्यामुळे अनेक गाड्या ढिगाऱ्याखाली अडकल्या आहेत. तर एक गाडी घाटातून खाली कोसळली असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातातून वाचलेल्या लोकांनी आपला चित्तथरारक अनुभव सांगितला आहे.