Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 27 ऑगस्ट 2021 | शुक्रवार | ABP Majha
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 27 ऑगस्ट 2021 | शुक्रवार | ABP Majha
1. काबुल विमानतळ परिसरात लागोपाठ तीन बॉम्बस्फोट, 72 हून अधिक जणांचा मृत्यू, तर 150 पेक्षा अधिक जण जखमी, आयसिसनं स्विकारली स्फोटाची जबाबदारी
2. काबुलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात अमेरिकेच्या 13 सैनिकांचा मृत्यू, स्फोट घडवून आणणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा इशारा
3. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरील चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंसह 27 नेत्यांना निमंत्रण
4. राज्यपाल कोश्यारींनी उद्धव ठाकरेंची भेट नाकारली, नाना पटोलेंचा आरोप, आता 1 तारखेनंतरच भेट होण्याची शक्यता
5. अटक नाट्यानंतर नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात, बालेकिल्ल्यात राणेंचे तोफ धडाडणार याकडे लक्ष, तर उद्धव ठाकरेंकडून व्हायरसची उपमा
6. पीओपीच्या मुर्तींची आता उत्सवासाठी विक्री नाहीच, नागपूर खंडपीठाचा निर्णय, उत्सव तोंडावर असताना विसर्जन कुठे करणार? भक्तांना चिंता
7. सणासुदीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची आरोग्य मंत्र्यांना भिती, मुंबईत एका अनाथआश्रमात 22, तर एकाच सोसायटीत 17 जणांना कोरोनाची लागण
8. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून 12 ते 18 वयोगटाचं लसीकरण, गंभीर आजार असलेल्या मुलांना प्राधान्य मिळणार
9. महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय पैलवान आप्पालाल शेख याचं दीर्घ आजारानं निधन, सोलापुरातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास, मूत्रपिंड निकामी झाल्यानं निधन
10. इंग्लंडचा कर्णधार जो रुटची सलग तीन कसोटींमध्ये तीन शतकं, लीड्स कसोटीत इंग्लंडला 345 धावांची आघाडी, भारतासमोर मोठं आव्हान























