ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 06 September 2024
ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 06 September 2024
विधानसभेच्या प्रचारासाठी भाजपचा मेगा प्लॅन तयार, गडकरी,फडणवीस,बावनकुळे आणि रावसाहेब दानवेंकडं राहणार प्रचाराचं नेतृत्व, २० स्टार प्रचारकांची टीमही तयार...'
मी देव झालो, असं स्वत:ला कुणी म्हणवून घेऊ नये, तुमच्यातलं देवत्व लोकांना ठरवू द्या, मोहन भागवतांचं वक्तव्य, क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखं कधी होऊ नये असाही सल्ला...
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसाठी ही शेवटची निवडणूक, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य, लोकसभा निवडणुकीवेळीही म्हणाले होते, पवारांची शेवटची निवडणूक...
देवेंद्र तेरी खैर नहीं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना फडणवीसांचं संयमी उत्तर, माझं नाव घेतलं याबद्दल आभार अशी प्रतिक्रिया..
जयदीप आपटेच्या बचावासाठी भाजपशी संबंधित कायदे पंडितांची फौज उभी, संजय राऊतांचा आरोप... तर जयदीप आपटेला संजय राऊतांनी लपवल्याचा संशय, फडणवीसांचा पलटवार
मुंबईत शिवाजी महाराजांचा पुतळा पाच वर्षांपासून
अडगळीत, मध्य रेल्वेच्या नियम बदलामुळे पुतळा धूळ खात पडल्याची चर्चा, एबीपी माझाचा एक्स्लुझिव्ह रिपोर्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खुर्चीसाठी चंद्रपुरातून सागवान वापरणार,३ हजार घनफूट सागवान पाठवणार असल्याची वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती, राम मंदिर, आणि संसद भवनातही वापरलंय चंद्रपूरचं सागवान...