ABP Majha Headlines : 9 AM : 13 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 AM : 13 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला नंदुरबारमधून सुरुवात, आज धुळे आणि मालेगावात यात्रा दाखल होणार, तर १७ मार्चला मुंबईतल्या शिवाजी पार्कात यात्रेचा समारोप.
गेल्या आठवड्यात २५०हून अधिक जीआर काढल्यावरून सामनातून सडकून टीका, अखेरचा हात मारण्यासाठी खोके सरकार कामाला लागलं, अग्रलेखात आरोप
सीएमओमध्ये आलेल्या प्रत्येक फाईलची आवक-जावक विभागात नोंद होणार, मुख्यमंत्री शिंदेंच्या बनावट स्वाक्षरीच्या प्रकरणानंतर निर्णय
लोकसभेसाठी अजित पवारांना केवळ चार जागांवर समाधान मानावं लागेल, तर विधानसभा निवडणुकीत सर्व जण भाजपच्याच चिन्हावर लढतील, रोहित पवारांचं खोचक वक्तव्य
विजय शिवतारे आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार, बारामतीतून निवडणूक लढवायची का यावर चर्चा करणार
एनडीएचा भाग असूनही भाजप आम्हाला विचारात घेत नाही, आम्ही स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या तयारीत, 300 उमेदवार रिंगणात उतरवणार, बच्चू कडू यांचं आव्हान
लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता, महाराष्ट्रात कुणाकुणाला तिकीट मिळणार याकडे लक्ष
आज राज्य मंत्रिमंडळाची आठवड्यात दुसऱ्यांदा बैठक, आचारसंहिता डोळ्यासमोर ठेवून मोठे निर्णय होण्याची शक्यता
आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक, अनेक मोठे निर्णय होण्याची अपेक्षा