ABP Majha Headlines : 7 AM : 29 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 AM : 29 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाच वाजेपर्यंतची मुदत...मात्र महायुती आणि मविआमध्ये काही जागांचा तिढा कायम...काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह बाळासाहेब थोरात, नवाब मलिक उमेदवारी अर्ज दाखल करणार, अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा नॉटरिचेबल, मुख्यमंत्री शिंदेंचा वनगा कुटुंबीयांशी चर्चा, विधानपरिषदेचं आश्वासन, पत्नीची माहिती
शरद पवारांनी ऐनवेळी मोहोळ मतदारसंघाचा उमेदवार बदलला, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सिद्धी कदम यांच्या जागी राजू खरे यांना संधी
बारामतीत भाषणादरम्यान कडक स्वभावाचे अजित पवार भावूक..आता साहेबांनी घरात फूट पाडली असं म्हणायचं का? अजितदादांचा शरद पवारांना सवाल...
युगेंद्र पवारांचा अर्ज भरू नका, असा सल्ला आईनं दिला होता, अजित पवारांचा दावा.. मात्र बंधू श्रीनिवास पवारांकडून खंडन...युगेंद्रच्या उमेदवारीवर ठाम...