ABP Majha Headlines : 8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील यांच्या प्रचारासाठी ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके नांदेड जिल्ह्यातील कंधारच्या दौऱ्यावर होते. मात्र या दौऱ्यादरम्यान त्यांच्या कारची गुरुवारी (7 नोव्हेंबर) तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर लक्ष्मण हाके चांगलेच आक्रमक झाले आहेत. या लोकांना विचाराची लढाई विचाराने लढता येत नाही. हिंमत असेल तर समोर येऊन हल्ला करा, असे लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले आहेत. सोबतच त्यांनी जोपर्यंत कंधार येथील पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात येणार नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यापुढे ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला कसा झाला? "साधारण 9 वाजेच्या सुमारास माझ्या गाडीवर हल्ला झाला. शंभर-दीडशे तरुणांनी येऊन आमच्या गाड्यांचा ताफा आडवला. आम्हाला वाटलं की ते ओबीसी तरूण असतील. कारण गावा-गावात आमचं उत्स्फूर्त स्वागत होत आहे. पण त्यांच्या हातात काळे झेंडे होते. हातात काठ्या होत्या, त्यांनी तोंडाला पांढरे रुमाल बांधलेले होते. विशेष बाब म्हणजे पोलीस विभागाचे लोकही तिथे उपस्थित होते. त्यामुळे हे षडयंत्र आहे. ओबीसीच्या माणसाने आरक्षणाच्या बाजूने बोलायचं नाही, ओबीसीच्या माणसाने निवडणूक लढवायची नाही. निवडणुकीचा अर्ज भरला तर प्रचार करायचा नाही, प्रचाराला जात असेल तर हल्ला करायचा, असं सगळं महाराष्ट्रात चालू आहे. हा महाराष्ट्र आज मणिपूरच्या वाटेने वाटचाल करतोय," असा हल्लाबोल हाके यांनी केला.
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f270132982449c525d533275454ec89e1739843525024976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)