ABP Majha Headlines : 7.00 AM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7.00 AM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महायुतीच्या नेत्यांविरोधात अपशब्द वापरणं टाळा, फडणवीसांचा भाजप नेत्यांना सल्ला, मतदारसंघात वेळ द्या, गणपतीच्या प्रसादासह फडणवीसांचा कानमंत्र
महायुतीला विदर्भात २५ जागा मिळण्याचा भाजपच्या सर्व्हेतून निष्कर्ष, नागपुरात भाजपला केवळ ४ जागा मिळत असल्याचं सर्व्हेत धक्कादायक चित्र
केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथकं सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात येणार. विधानसभेपूर्वी राज्याचा पथक घेणार आढावा.
अनेक वर्षांच राजकीय वैर बाजूला ठेवून अजित पवार आणि सुरेश कलमाडी आज एकत्र येणार. पुणे फेस्टीव्हलचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे हस्ते उद्धाटन.उद्घाटनाला कलमाडींची उपस्थिती.
पूजा खेडकर खोटं बोलत असल्याचा यूपीएससीचा आरोप, पूजा खेडकरनं कोर्टासमोर खोटी माहिती दिली, दिल्ली हायकोर्टात सुनावणी दरम्यान यूपीएससीच्या वकीलांनी केला आरोप
अंबरनाथ एमआयडीसीत केमिकल कंपनीतून वायूगळती.गॅस संपूर्ण शहरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. तर वायू गळती आटोक्यात आल्यानं नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन.