ABP Majha Headlines : 6.30 AM : 03 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 6.30 AM : 03 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
यवतमाळमधून भावना गवळी यांना तिकीट नाकारल्याने समर्थक आक्रमक, आज सकाळी ११ वाजेपर्यंत निर्णय घेतला नाही तर वेगळी भूमिका घेण्याचा इशारा
हिंगोलीत देखील महायुतीनं उमेदवार बदलला, हेमंत पाटलांऐवजी बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी, आज अर्ज भरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, अमरावतीतून फडणवीसांचा उपस्थितीत नवनीत राणा अर्ज भरणार
नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आज सुप्रीम कोर्टाचा निकाल, सकाळा साडे अकराच्या सुमाराला निकाल येण्याची शक्यता
रामटेकमध्ये वंचितचा अपक्ष किशोर गजभियेंना पाठिंबा, रामटेकमध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, महायुतीचे राजू पारवे, आणि गजभियेंशी तिरंगी लढत
पृथ्वीराज चव्हाणांनी साताऱ्यातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रस्ताव, पृथ्वीराज चव्हाणांचा स्पष्ट नकार
संजय निरूपम यांना काँग्रेसमधून काढलं, ठाकरे गटाबद्दल सातत्यानं जाहीर विधानं केल्यानं कारवाई, निरुपम यांच्या भूमिकेकडे लक्ष
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टरमुळे उत्सुकता शिगेला, भाजपसोबत झालेल्या बैठकांबद्दल राज ठाकरे सांगणार का याकडे लक्ष