ABP Majha Headlines 01 PM एबीपी माझा हेडलाईन्स 01 PM 22 July 2024 Marathi News
मविआच्या नेत्यांना ठोकून काढा या फडणवीसांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार, राजीनामा द्या आणि असं वक्तव्य करून दाखवा, राऊतांचं आव्हान
अमित शाहांचे शरद पवारांवरील आरोप निराशा आणि वैफल्यातून, संजय राऊतांची बोचरी टीका
उद्धव ठाकरे ४ ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर जाणार..इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत उद्धव ठाकरे थेट चर्चा करणार.
शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार, आरक्षणाच्या प्रश्नावर काय भूमिका मांडणार याची उत्कंठा, दुपारी दोन वाजता होणार बैठक...
कोल्हापुरातील पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली, पावसाचा जोर ओसरला तरीही पाणीपातळीत संथ गतीनं वाझ
जुलै महिन्याची 22 तारीख उजाडली तरी उजनी धरणात उणे २२ टक्के पाणीसाठा, जायकवाडी धरणातही फक्त ४ टक्के पाणीसाठा शिल्लक
पुण्यातील पिंपरीमध्ये हिट अँड रनची घटना, रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिलेला कारची धडक, महिला जखमी, चालक पसार.