ABP Majha Headlines : 02.00 PM : 29 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचं दहन, महाडमध्ये जोरदार आंदोलन, शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतले श्लोक समाविष्ट करण्यास विरोध
पुणे अपघात प्रकरणात आरोपी कितीही मोठा असला तरी कारवाई करा, पुणे पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांची कडक शब्दात समज
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सदस्याची चौकशी होणार, समिती स्थापन
पुणे अपघात प्रकरणात आमदार मुलाचाही समावेश, नाना पटोलेंचा गंभीर आरोप, अपघातग्रस्त गाडीतून उतरलेले दोघे कोण, पटोलेंचा सवाल
अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी विशाल अगरवालचे डॉ. तावरेला तब्बल १४ फोन कॉल, रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात नवी माहिती, डॉ.तावरे आणि डॉ. हळनोर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
अपघात प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी डॉ. तावरेच्या जिवाला धोका निर्माण केला जाऊ शकतो, सुषमा अंधारेंचा आरोप...तर चमकोगिरीसाठी विरोधक आरोप करतात शिरसाटांचा पलटवार
१८ तासांनंतर गुजरातच्या दिशेने मेल एक्स्प्रेसची वाहतूक सुरू, विरार डहाणू लोकल वाहतूक सुरू होण्यास आणखी काही तास लागण्याची शक्यता
१५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाचा अंदाज, यावर्षी सरासरीपेक्षा १०६ टक्क्यांनी अधिक पावसाची शक्यता
काँग्रेस नेते करणार दुष्काळी भागाची पाहणी, काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन, सरकारने केलेल्या उपाययोजनांवर काँग्रेस समितीची नजर
सांगली जिल्ह्यात तासगाव - मणेराजुरी मार्गावर अल्टो कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
सामूहिक हत्याकांडाच्या घटनेेने मध्य प्रदेश हादरला, आदिवासी तरुणाकडून कुऱ्हाडीने हल्ला करुन कुटुंबातील 8 जणांची हत्या, नंतर स्वत:चं आयुष्यही संपवलं
मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा गोत्यात, १९६२ च्या भारत चीन युद्धात चीनने कथितरित्या भारताचा भाग बळकावल्याचं वक्तव्य, काँग्रेसची सारवासारव
१९९९ मध्ये पाकिस्तानकडून लाहोर कराराचं उल्लंघन करून चूक केल्याची नवाज शरीफ यांची कबुली, कारगिल युद्धाच्या रूपात कराराचं उल्लंघन झाल्याची कबुली