ABP Majha Headlines : 01:00PM : 19 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
वर्धापन दिनालाच ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का...काल बैठकीला उपस्थित असलेले दोन नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार...शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवकही शिंदेंच्या गळाला...
शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीच्या हालचाली सुरू, उदय सामंत विशेष प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहिती...युती पूर्णत्वास नेण्यासाठी शिंदे राज ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती...
शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीच्या हालचाली सुरू, उदय सामंत विशेष प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहिती...युती पूर्णत्वास नेण्यासाठी शिंदे राज ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती...
भंडाऱ्यात शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर विरूद्ध भाजप आमदार परिणय फुकेंमध्ये वाद शिगेला...फुकेंना भंडाऱ्याचं राजकारण समजायला अजून वेळ लागेल, त्यांनी पक्ष वाढवण्यावर भर द्यावा, भोंडेकरांचा खोचक सल्ला...
भाजपकडून नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी.. स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रदेश कार्यकारिणीकडे मागणी...सध्या सुरू असलेल्या इनकमिंगमुळे भाजपचा आत्मविश्वास वाढल्याची चर्चा...
पुण्यात सकाळपासून पावसाचा जोर वाढला,
हिंगणे खुर्द, पर्वतीसह हिंजवडीतील भोईरवाडी गुडघाभर पाणाी, पावसामुळे टिळक रस्त्यावरील सिग्नल पोल झुकला
रात्रभराच्या पावसानंतर मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत
रायगड जिल्हात आज अतिमुसळधार पावसाचा ...कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर...रोहा आणि सुधागड तालुक्याला मोठा फटका
कोणत्याही परिस्थितीत शरण येणार नाही, इराणनं अमेरिकेला ठणकावलं... तर ट्रम्प आज रात्री ९ वाजता युद्धासंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता, इस्रायल आणि भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांचीही चर्चा
अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालेल्या क्रू मेंबर रोशनी सोनघरेंना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, डोंबिवलीत अंत्यसंस्कार, एअर इंडियातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह नातेवाईक राजकीय क्षेत्रातील मंडळींकडून आदरांजली
अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली यांचं सोलापुरात निधन...वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...बऱ्याच दिवसांपासून होते आजारी...























