ABP Majha Headlines : 12 PM : 17 May 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अटक होण्याआधी एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचा संजय राऊतांचा दावा, शिंदेंनी अमित शाहांशी बोलण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती, राऊतांच्या नरकातल्या स्वर्ग पुस्तकाचं आज प्रकाशन
अमित शाह दिल्लीत आल्यावरच शिवसेना आणि भाजपमधली दरी वाढू लागली, संजय राऊतांचा आरोप... अरुण जेटलींनीही शाहांना समजवायचा प्रयत्न केल्याचा दावा
पुणे महापालिका निवडणुकीत महायुतीला ब्रेक लागण्याची शक्यता...फडणवीसांनी पुणे भाजपला दिलं १०५ नगरसेवकांचं टार्गेट...पुणे महापालिकेत एकूण १६६ जागा...
शरद पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात महिलांना राजकारणात ३३ टक्के आरक्षण, पुण्यात अजित पवारांकडून शरद पवारांच्या निर्णयाचं कौतुक
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानचे ६०० ड्रोन हाणून पाडल्याची सूत्रांची माहिती, ८ आणि ९ तारखेच्या रात्री पाकिस्तानकडून हवाई हद्दीचा भंग
भारतीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे नूर खान एअरबेस भागात डागली, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची माहिती...१० मे रोजी पहाटे असीम यांचा फोन आल्याची शरीफ यांची माहिती
भारत सरकार जगाला सांगणार ऑपरेशन सिंदूरचं सत्य, केंद्राकडून सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाची स्थापना, परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसह शिष्टमंडळ देणार विविध देशांना भेट
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम...मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला सोपवणार...पाकिस्तानची विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी दहशतवादी मागण्याची शक्यता...























