ABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
छत्रपती संभाजीनगरमध्ये यूपीएससी परीक्षेत गोंधळ, गुगल मॅपच्या चुकीमुळे यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, विद्यार्थ्यांना अश्रू अनावर
एक जूनपासून मुलींना राज्यात मोफत शिक्षण देण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा हवेतच विरली, अर्धा जून महिना उलटला, मात्र ना जीआर, ना अंमलबजावणी
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर अमित शाह आणि मोदी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांचा पक्ष फोडतील, राऊतांचा दावा तर लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची मागणी
कलिना भूखंड गैरव्यवहारप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाची भुजबळांना तंबी, सुनावणीसाठी हजर राहा, अन्यथा वॉरंट
शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांचा मेळावा... जयदत्त क्षीरसागर कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष
४०० पार आणि हिंदुराष्ट्राची भाषा करणाऱ्या भाजप आमदाराला मिटकरींचा टोला, ग्लानिर्भवती "भारत" हा कृष्णाचा उपदेशसुद्धा टी राजा विसरला, मिटकरींकडून टी राजांचा एकेरी उल्लेख