ABP Majha Headlines : 07:00AM : 11 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महापालिका निव़डणुकांबाबत राज्य सरकारचं मोठं पाऊल, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर , नाशिक, संभाजीनगर, कल्याण डोंबिवली आणि वसई-विरार महापालिकांच्या प्रभाग रचनेचे आदेश
मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयात आजपासून सुनावणी, पूर्ण खंडपीठासमोर होणार युक्तिवाद, विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडल्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष
अमरावतीच्या मोझरीत बच्चू कडूंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस...शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधनासह १७ मागण्यांसाठी अन्नत्याग...जरांगे आज आंदोलनस्थळी भेट देणार
अमरावतीच्या मोझरीत बच्चू कडूंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस...शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधनासह १७ मागण्यांसाठी अन्नत्याग...जरांगे आज आंदोलनस्थळी भेट देणार
मेळाव्यात जरी निर्णय झाला नसला तरी राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत सुप्रिया सुळेंचं लेखात महत्त्वाचं भाष्य, आठ खासदारांची भूमिका आणि पवार-जयंत पाटलांशी चर्चेनंतर निर्णय घेणार
सर्वच लोकल एसी करण्याचा आग्रह, तर गर्दीच्या नियोजनासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळाही बदलण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांची माहिती
मुंब्रा दुर्घटनेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून हल्लाबोल...दुर्घटनेतील बळी हे पाप रेल्वेचेच, सामनातून ताशेरे...
राज्यात कोरोनाच्या ८९ नव्या रुग्णांची नोंद...सध्या अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ५९३वर...तर मुंबईत आतापर्यंत ७१९ कोरोनाबाधित रूग्ण...
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक, काय चर्चा होणार? याकडे लक्ष, सीसीएसची बैठकही होण्याचीही शक्यता.























