ABP Majha Headlines : 11 AM : 18 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचं मोठं वक्तव्य
((संघाबद्दल नड्डा यांचं मोठं वक्तव्य))
संघला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही, उद्धव ठाकरेंचा घणाघात, नकली शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना हल्लाबोल
बुलडोझर चालवणार नाही तर राम मंदिराचं उर्वरित काम पूर्ण करू, मोदींच्या टीकेला उत्तर देतान ठाकरेंचा पलटवार, तर सर्वधर्मीय स्थळांचं संरक्षण ही आमची भूमिका, पवारांचं वक्तव्य
सत्ता आल्यास देशात सरसकट एकच जीएसटी, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत खरगेंची घोषणा, प्रचारात मोदी जनतेला भडकवत असल्याचा आरोप
मुंबईतल्या भाजपाच्या प्रचारासाठी राज ठाकरेंकडून बैठका, आशिष शेलारांच्या साथीनं घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरात शाखाभेटी
मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?))
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज मालेगावात सभा, नतंर मुंबईत उज्ज्वल निकमांसाठी देखील प्रचार करणार
((मालेगावमध्ये गरजणार योगी आदित्यनाथ))
महामुंबईसह नाशिक, धुळ्यातल्या प्रचारासाठी अखेरचा दिवस, सर्वच पक्षांच्या सभा आणि रॅलींचा धुरळा
((आज थंडावणार प्रचाराच्या तोफा))
भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा.,.. नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचा मोठा दावा... तर गोडसेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष
संभाजीनगर गर्भलिंग निदान प्रकरणी आयुर्वेदिक डॉक्टर रोशन ढाकरेला अटक, रॅकेटमध्येे १५ ते २० एजंट्सचा सहभाग असल्याचं तपासात समोर
((डॉक्टरच घ्यायचा अर्भकांचा जीव))
नागपूरह विदर्भाला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं वर्तवली वादळी पावसाची शक्यता
((विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट))
मुंबईतला उकाडा सोमवारपर्यंत कायम राहण्याचा अंदाज, हवेतील आर्द्रता प्रचंड वाढल्यामुळे मुंबईकर घामाघूम
((मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचेच))
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आज आणि उद्या दीड तास बंद राहणार, ओव्हरहेड गँट्रीच्या कामासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळी साडे दहा ते दुपारी १२ पर्यंत बंद ठेवणार
((एक्स्प्रेसवे दीड तास बंद राहणार))