ABP Majha Headlines : 10 AM : 17 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 10 AM : 17 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाविकास आघाडीकडे जागावाटपाचे दोन फॉर्म्युले, वंचितशिवाय २२-१६-१० तर वंचितसह २०-१५-९-४ असा फॉर्म्युला, हातकणंगल्यात राजू शेट्टींना बाहेरुन पाठिंबा
उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे शिंदे गटात जाण्याच्या तयारीत, आज शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता, पारवेंना रामटेकमधून उमेदवार मिळणार का याकडे लक्ष
विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर घरवापसीच्या तयारीत, माढा, सोलापूर, बारामतीत महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता, गिरीश महाजनांकडून मोहिते पाटलांची मनधरणी
विजय शिवतारे आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार, बारामती लोकसभा निवडणुकी संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता
अजित पवारांविरोधात सख्खा भाऊ मैदानात....शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं, श्रीनिवास पवारांची अजित पवारांवर टीका. शेत करायला दिलं म्हणून मालक होत नसल्याचाही टोला..
उद्धव ठाकरे आज आणि उद्या हिंगोली दौऱ्यावर, मतदारसंघात चार सभा होणार, ठाकरे गटाचा हिंगोली लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता
निवडणूक रोख्यांप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, रोख्यांच्या युनिक आयडीबाबत स्टेट बँकेकडून उत्तर अपेक्षित
निवडणूक रोख्यांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षनिहाय मिळकतीची माहिती जाहीर, भाजपवर सर्वाधिक धनवर्षाव तर दुसऱ्या स्थानी तृणमूल काँग्रेस