ABP Majha Headlines : 07 PM : 31 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
शरद पवारांच्या पक्षातला मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत, सुनील तटकरे यांचा दावा, एबीपी माझाची EXCLUSIVE बातमी
((शरद पवारांच्या पक्षातला मोठा गट नाराज?))
४ जूननंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता, काही मंत्रांची खाती बदलणार... तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देणार, सूत्रांची एबीपी माझाला माहिती...
((४ जूननंतर मंत्रिमंडळात मोठे बदल?))
भुजबळांच्या भूमिकेवरून अजित पवार गटात जुंपली...भुजबळांनी आव्हाडांना पाठिंबा देणं दुर्दैवी, हसन मुश्रीफांची नाराजी...तर मुश्रीफ सीनिअर आहेत, भुजबळांचा टोला...
मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढणार, मनोज जरांगे यांची घोषणा...
((...तर सर्व २८८ जागा लढणार-जरांगे))
मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या अनिल बोेरनारेंनी घेतले दोन उमेदवारी अर्ज, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडेंना याआधीच उमेदवारी जाहीर...
((शिक्षक निवडणुकीत महायुतीमध्ये बंडखोरी?))
परकीय गुंतवणुकीत सलग दोन वर्षं महाराष्ट्र अव्वल, २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यात सव्वा लाख कोटींचा एफडीआय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
((परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच अव्वल!))
पुण्याचे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसेंची मतमोजणीआधी बदली करावी, खेडच्या प्रांताधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी...दिवसे खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप....
बीडच्या माजलगामधील पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंत्याच्या लॉकरमध्ये आढळला १ कोटी ६१ लाखांचा मुद्देमाल, कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर सध्या जामिनावर.
बार आणि पब्जसाठी सरकारची नियमावली जाहीर...बारमधल्या सीसीटीव्हीचं कनेक्शन थेट पोलीस स़्टेशनमध्ये...वेळमर्यादा न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार...
पुण्यातील ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी दोन्ही डॉक्टर आणि शिपायावर बडतर्फीची टांगती तलवार, वैद्यकीय शिक्षण खात्याकडून विभागीय चौकशी होणार
((तावरे, हळणोरवर बडतर्फीची तलवार))
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाचच्या रुंदीकरणाचं ३० ते ३५ टक्के काम पूर्ण, मेगाब्लॉकमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी
((ठाणे स्थानकात युद्धपातळीवर काम सुरू))
राज्यात पाणीटंचाईचं भीषण संकट...धरणांमध्ये केवळ २२.४३ टक्के पाणीसाठा.... तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी ९ टक्के पाणीसाठा
पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकात ध्यानस्थ, तर ही केवळ शोबाजी, विरोधकांची टीका
((मोदी ध्यानस्थ, विरोधकांचं टीकास्त्र))
पंढरपुरातील आढळलेल्या गुप्त खोलीत
विविध प्रकारच्या मुर्ती सापडल्या, मंदिर समितीच्या अध्यक्षांसह पुरातत्व विभागाकडून पाहणी