ABP Majha Headlines : 07AM : 16 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाविकास आघाडी आज फोडणार प्रचाराचा नारळ, मुंबईत षण्मुखानंद सभागृहात मेळावा, उद्धव ठाकरे, शरद पवार, पटोले, थोरातांसह सर्व मविआ नेत्यांची उपस्थिती
विधानसभा लढण्यासंदर्भात अजित पवारांच्या एजन्सीकडून कर्जत-जामखेडमध्ये सर्व्हे...रोहित पवारांची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह माहिती..अजितदादांनी इंदापूरचा पर्याय ठेवल्याचाही दावा...
सात ते आठ वेळा बारामतीतून लढलो आता रस नाही, अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण...बारामतीतून जय पवार विधानसभेसाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा...
शरद पवारांसोबत जाणार का या प्रश्नावर अजित पवारांचं नो कमेन्ट, बारामतीत सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करणं ही चूक, अजित दादांकडून पुनरुच्चार
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख असणार, काँग्रेसनंच प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती....मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मात्र निवडणुकीनंतरच ठरण्याची शक्यता...
मला हलक्यात घेऊ नका, जरांगेंचा इशारा, फडणवीसांची राजकीय गणितं फेल होणार, जरांगेंचं आव्हान
विनय कोरेंनी महायुतीकडे मागितल्या १५ जागा, कोल्हापूरच्या चार जागांसोबत सांगली, कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यातल्या जागा लढण्याची तयारी
इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारला देशव्यापी संप, उद्यापासून २४ तासांसाठी ओपीडीसोबतच वैकल्पिक शस्त्रक्रिय बंद, अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार
गणेशोत्सवासाठी कोकणात भाजपकडून ७०० बसेस, तीन विशेष रेल्वेगाड्यांचं आयोजन, कोकणातल्या मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न
मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यातील २ स्टेशनांनाच अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्याचं उघड, इतर प्रमाणपत्रांसाठीही अनेक गोष्टी रखडल्याचं उघड
पंतप्रधान मोदी पुढील महिन्यात अमेरिका दौऱ्यावर, २६ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात बोलणार मोदी
भारतात महिला टी ट्वेंटी वर्ल्डकप आयोजनास बीसीसीआयचा नकार, आयसीसीची मागणी फेटाळली, श्रीलंका किंवा यूएईत आयोजनाची शक्यता