ABP Majha Headlines : 05 PM : 10 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा अखेर भारतात...दिल्लीतल्या पालम विमानतळावर विशेष विमानानं राणाला आणलं...एनआआयएच्या मुख्यालयात नेलं...
अमेरिकन कोर्टानं अनुमती दिलेल्या कलमांनुसारच राणावर खटला चालण्याची शक्यता...सुनावणीसाठी अॅडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती...
पाकिस्ताननं झटकले तहव्वूर राणापासून हात... राणा कॅनडाचा नागरिक, पाकिस्तानशी संबंध नाही, पाकच्या परराष्ट्रमंत्रालयाचा दावा...
बिहार निवडणुकीपर्यंत भाजपचं राणा फेस्टिव्हल सुरूच राहणार, संजय राऊतांचा टोला...पाकिस्तानातल्या जेलमध्ये अडकलेल्या कुलभूषण यादवांना भारतात आणा, राऊतांचं आव्हान...
तहव्वूर राणाला आझाद मैदानासारख्या सार्वजनिक जागी फाशी द्या, शहीद तुकाराम ओंबळेंचे भाऊ एकनाथ ओंबळेंची मागणी..शिक्षा द्यायला कसाबसारखा उशीर करू नये, सरकारकडे अपेक्षा...
एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात मिळाला केवळ ५६ टक्के पगार, निधी कमतरतेमुळे पगार कमी झाल्याची माहिती, कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं? इंटकच्या श्रीरंग बरगेंचा सवाल
राज्य सरकारकडून मंत्री आणि सचिवांसाठी १ कोटींची आयपॅड खरेदी, मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी खरेदीचा निर्णय, सामान्य प्रशासन विभागाकडून जीआर जारी
सुनील तटकरेंचं जेवणाचं आमंत्रण अमित शाहांनी स्वीकारलं, पालकमंत्रिपदाबाबत चर्चेची शक्यता, केंद्रीय गृहमंत्री १२ एप्रिलला रायगड दौऱ्यावर,
वाल्मिक कराडच्या मालमत्ता जप्तीसाठी सीआयडीचा बीड न्यायालयात अर्ज, तर कराडच्या वकिलांकडून निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज, २४ एप्रिलला संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी
धनंजय मुंडे औरंगजेबापेक्षाही क्रूर, करुणा मुंडेंचा हल्लाबोल, संघर्षाच्या काळात मालमत्ता, मंगळसूत्र गहाण टाकून मुंडेसाठी पैसे उभे केल्याचा दावा
सप्तश्रुंगी गडावर चैत्र उत्सव यात्रेच्या निमित्तानं भाविकांची तोबा गर्दी...प्रशासनाचं नियोजन कोलमडल्यानं भाविकांचे अतोनात हाल...
२०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश... आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून क्रिकेटच्या समावेशावर शिक्कामोर्तब... १२८ वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार























