ABP Majha Headlines : 03 PM : 28 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
माझे आयुष्य एका ध्येयासाठी समर्पित, मी निवडणुकांचे कल किंवा निकालावर लक्ष देत नाही, पंतप्रधान मोदींचा दावा, रात्री ८ वाजता मोदींची एक्स्लुझिव्ह मुलाखत
ससूनमधील डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी पल्लवी सापळेंची टीम ससूनमध्ये, तर चौकशी करणारे किती स्वच्छ? अंबादास दानवेंचा सवाल
दबावाला बळी पडू नका, काँग्रेस आमदार धंगेकरांची ससून डीनची भेट घेऊन सूचना...तावरे मंत्र्याच्या जवळचे असल्याने पद मिळाल्याचा आरोप...
पुण्यातील ससून रुग्णालयातील प्रकरणात फडणवीसांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी
ससून रूग्णालयाच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी
सुप्रिया सुळेंवर सोनिया दुहान यांचा हल्लाबोल, सुप्रिया सुळेंमध्ये नेतृत्वगुण नाहीत, सुप्रिया सुळेंच्या जवळच्या काही लोकांमुळे पक्ष सोडत असल्याची टीका
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक, मान्सूनपूर्व तयारीसह दुष्काळी परिस्थितीचाही आढावा
विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज महायुतीची खलबतं, मनसेला मदत करणार की महायुती चारही जागांवर उमेदवार देणार याची उत्सुकता
मुंबई शिक्षण मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीनं लढवावी छगन भुजबळांची भूमिका...देवगिरी बंगल्यावरील बैठकीत चर्चा
एबीपी माझाच्या बातमीनंतर बीड जिल्ह्यातील सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच वाढला, मुंढेवाडी प्रकरणात एकाला अटक, १९१ जणांवर कारवाई.
डेरा सच्चा सौधा प्रमुख गुरमीत राम रहीमला पंजाब हरयाणा हायकोर्टाचा मोठा दिलासा, डेरा मॅनेजर रंजीतसिंग हत्याप्रकरणात निर्दोष मुक्तता, अखेरच्या टप्प्याचं मतदान होण्याआधी सुटका झाल्याने चर्चा