100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha Latest News
100 Headlines Superfast News Maharashtra Politics Marathi News ABP Majha 26 September 2024
पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी चिखलाचं साम्राज्य, एसपी कॉलेजच्या मैदानावर दुरुस्तीचं काम सुरु, सभास्थळी लाकडी फळ्या टाकून त्यावर खुर्चा लावण्याचं काम सुरु.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेवर पावसाचं सावट, गरज पडल्यास मोदींच्या सभेचे ठिकाण बदलले जाण्याची शक्यता,पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचाचा पर्यायी जागा म्हणून विचार सुरु.
अजित पवारांकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी, सकाळी 6 वाजता दादांकडून अधिकाऱ्यांसह आढावा.
पुणे कॉंग्रेसकडून पंतप्रधान मोदींच्या ताफ्याच्या मार्गावर आंदोलन करण्यात येणार, पुणेकरांचे हाल होत असताना आणि अनेक प्रश्न प्रलंबित असताना उद्घाटन, काँग्रेसचा आरोप.
मोदींच्या ताफ्या समोरील कॉंग्रेस नेत्यांचा आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली, पोलिसांच्या काँग्रेस नेत्यांना नोटीसा, मात्र कॉंग्रेस नेते आंदोलनावर ठाम.
पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याला मराठा समाज विरोध करणार नाही, आंदोलन किंवा निषेध करण्यात येणार नाही असं मराठा समाजाचं पोलीस उपायुक्तांना लेखी निवेदन.
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी संत तुकाराम पगडी, पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांनी मोदींसाठी बनवली हटके पगडी, या पगडीमार्फत वारकरी संप्रदाय आणि अठरा पगड जातींना साद घालण्याचा प्रयत्न.
पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोंच्या हस्ते लोकार्पण. मोदींच्या स्वागतासाठी मेट्रो प्रशासनाकडून तयारी पूर्ण. जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनला आकर्षक फुलांची आरास.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त आज पुण्यातील वाहतुकीत बदल, दुपारी ३ वाजल्यापासून हे बदल लागू असतील.