Maratha Reservation : Latur मध्ये 54 लाख कुणबी लोकांना प्रमाणपत्र देण्यास सुरुवात
कुणबी नोंदी सापडलेल्या ५४ लाख जणांना तात्काळ प्रमाणपत्र देण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने धावाधाव सुरू केलीय. शिंदे समितीला ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांना तात्काळ प्रमाणपत्र वाटप करण्याचे आदेश दिलेत. महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश जारी केलेत. कुणबी प्रमाणपत्राबाबत सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. जिल्ह्याजिल्ह्यात शिबीर आयोजित करून तात्काळ प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम सुरूही झालं आहे. प्रत्येक तलाठी कार्यालयाने गाव पातळीवर कुणबी प्रमाणपत्राच्या याद्या प्रसिद्ध करून वाटप करण्याचे आदेश दिलेत.

















