एक्स्प्लोर
Latur Yatra : लातूरमध्ये दोन वर्षांनंतर भरली सिद्धेश्वर आणि रत्नेश्वराची यात्रा, गावकऱ्यांमध्ये उत्साह
लातूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर आणि रत्नेश्वराची यात्रा तब्बल दोन वर्षांनंतर भरलीय. गेले दोन वर्ष कोरोनामुळे ही यात्रा भरली नव्हती.. मात्र गेल्या दोन वर्षांची कसर या यात्रेत भरुन निघालीय.. जवळपास १७ दिवस ही यात्रा चालते. महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रेला प्रारंभ होतो. संध्याकाळच्यावेळी या यात्रेचा परिसर हा उजाळून निघतो. याच यात्रेचं विहंगम दृश्यं महेश खोसे या तरुणानं आपल्या ड्रोन कॅमेऱ्यातून टिपण्याचा प्रयत्न केलाय.
आणखी पाहा



















