Tulja Bhavani Temple : कसा आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा घटनाक्रम, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुया
Tulja Bhavani Temple : कसा आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा घटनाक्रम, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुया
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचीही नावं आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ड्रग्स प्रकरणातील 35 आरोपींपैकी मंदिरातील 13 पुजाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पोलिसांकडून तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे. तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावे आल्याने सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा, तुळजापूर पुजाऱ्यांचं गाव आहे, ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे म्हणाले. ((दरम्यान तीन वर्षापासून तुळजापूर इथे सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करी विरोधात पुजारी मंडळाने पहिल्यांदा आवाज उठवल्याचा दावा देखील विपीन शिंदे यांनी केलाय))























