Kolhapur Rajaram Factory Election : राजाराम कारखान्यासाठी आज मतदान, महाडिक- सतेज पाटील आमने - सामने
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतेय... या निवडणुकीसाठी धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये...दरम्यान सतेज पाटील गटाने
बुथवर अंगठी चिन्हाचा वापर केल्याचा आक्षेप महाडिक गटाने केला होता त्यानंतर बुथवरील अंगठी चिन्ह काढण्यात आलंय.. कोल्हापूर शहरातील दोन केंद्रासह सहा तालुक्यातील 58 केंद्रावर मतदान सकाळी ८ वाजलेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.. मतदान प्रकिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झालंय... तर मतदान केंद्र परिसरात 144 कलम लागू करण्यात आलं असून पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय... २५ एप्रिलला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे..
महत्त्वाच्या बातम्या























