Kolhapur : कोल्हापुरात स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन, छत्रपती शाहू महाराजांचा देखील आंदोलनाला पाठिंबा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बँगलोर महामार्गावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसदर वाढ मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहे..हे आंदोलन दडपण्यासाठी सरकार कडून अनेक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ताब्यात घेण्याचे सत्र सुरू आहे..दरम्यान, हे आंदोलन दडपतांना राजू शेट्टी यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी गाठ स्वाभिमानीशी आहे, संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा स्वभानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिला आहे..मराठ्यांच्या आंदोलनाचे सरकारने परिणाम भोगले आहे आता स्वाभिमानीचे आंदोलन संवेदनशील पद्धतीने हाताळा अन्यथा गाठ स्वाभिमानीशी आहे असा इशारा जगताप यांनी दिला आहे...























