Dhairyasheel Mane daughter : खासदार धैर्यशील माने यांची कन्या आदिश्रीचा हट्ट काय होता?
Dhairyasheel Mane : ठाकरे कुटुंबाशी भावनिकदृष्ट्या आजही जोडला गेलो आहे. आयुष्यभर ठाकरे कुटुंब माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय असल्याचे मत हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी व्यक्त केले. आपापसातील मतभेद थांबावे आणि सर्वांनी एकत्र यावं यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो असेही माने म्हणाले. एखाद्या माणसाला घर सोडताना जो त्रास होतो, तशीच माझीही मनस्थिती झाल्याचे माने म्हणाले. पण राजकीय परिस्थिती आणि भविष्य पाहता जनतेशी असलेल्या बांधिलकीसाठी निर्णय घेतल्याचे मानेंनी सांगितले. जर काँग्रेस शिवसेना एकत्र येऊ शकतात तर शिंदे गट आणि शिवसेना पुन्हा एकत्र का नाही येणार असेही ते म्हणाले.























