एक्स्प्लोर
Manoj Jarange Bacchu Kadu Meet : कुणबी नोंदींवरुन जरांगे आणि कडूंमध्ये चर्चा
मराठा आरक्षण कार्यकर्ते आज सरकारवर चांगलेच संतापले. कुणबी नोंदींची यादी गावोगावी न लागल्यानं जरांगे सरकारवर नाराज झाले. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेल्या बच्चू कडूंसमोर त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. काही सरपंचाचं बच्चू कडू यांच्याशी त्यांनी फोनवरून बोलणं देखील करून दिलं. कडू यांनी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांना फोन करून कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना केली. दरम्यान, आश्वासन देऊन देखील बहुतांश गावांमध्ये यादी लागलेली नाही, तुम्ही २० तारखेच्या आत प्रमाणपत्र देणं सुरू करा, प्रशासनाला २४ काम करायला सांगा, मग मी मुंबईला जाणार नाही असं जरांगे म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















