एक्स्प्लोर

दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार

राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास एका कारमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली होती.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील (Delhi) लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाची (Blast) दखल घेत केंद्रीय मंत्रिमंडळाने आज निषेधाचा ठराव संमत केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक संपन्न झाली. या बैठकीत दिल्लीतील भीषण स्फोटासंदर्भाने कठोर निषेध करणारा आणि मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहणारा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini vaishnav) यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींची आज रुग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली. तसेच, भुतान दौऱ्यातूनही त्यांनी दिल्लीतील स्फोटावर भाष्य करत हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा दिला होता.

राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास एका कारमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली होती. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 15 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेनंतर तात्काळ रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली होती. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज जखमींची भेट घेऊन संवाद साधला.

दिल्लीत झालेला हा हल्ला दहशतवादी कटाचा भाग असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून या घटनेनं देश हादरला आहे. त्यामुळेच, दिल्ली स्फोट प्रकरणात केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ठराव संमत केला आहे. त्यानुसार, या स्फोटाचा कठोर निषेध करत आणि मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, या स्फोटाचा सखोल तपास करून कट रचणारे, त्यावर अंमल करणारे आणि त्यांचे पाठीराखे शोधले जातील, असा निर्धार कॅबिनेट बैठकीत करण्यात आला. दरम्यान, दिल्ली स्फोट तपास कामावर सर्वोच्च शासकीय पातळीवरून लक्ष ठेवण्यात आले आहे, अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली.

हेही वाचा

शरद पवार अन् अदानी सोफ्यावर, मुख्यमंत्री खुर्चीवर; शाही सोहळ्यात दिग्गज एकत्र, व्हायरल फोटो कुणाच्या लग्नातला?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagpur Winter Season : चहापानाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार
MVA PC Winter Session :  ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Embed widget