Laxman Hake Jalna : सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला; काय झाली चर्चा ?
Laxman Hake Jalna : सरकारचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला; काय झाली चर्चा ?
वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) हे नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज राज्यसरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र हाके आणि वाघमारे आंदोलनावर ठाम आहेत. यावेळी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली. आज सायंकाळी सह्याद्रीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आता या बैठकीत नेमका काय तोडगा निघणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि गोपीचंद पडळकर यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, एवढे दिवस उपोषण करणे घातक आहे. सरकारची ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी भूमिका आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सचिव यांच्यासोबत बैठक करून निर्णय घेऊ. लक्ष्मण हाके यांनी शिष्टमंडळ मुंबईला पाठवावे. लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावे आणि सरकारशी चर्चा करावी, अशी विनंती त्यांनी केली.