एक्स्प्लोर
Jalna Reda Race : जालन्यात विनापरवाना रेड्यांची टक्कर, रेड्याच्या धडकेत अनेक नागरिक जखमी
जालना जिल्ह्यातल्या खादगावात विनापरवाना रेड्यांची टक्कर लावणं महागात पडलंय.. या रेड्याच्या धडकेत अनेक नागरिक जखमी झालेत... चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतील खादगाव शिवारात शनिवारी विनापरवाना रेड्यांच्या टक्कर भरवण्यात आली होती... टक्कर पाहण्यासाठी शेकडो नागरिक जमले होते. दरम्यान, टक्कर सुरू असतानाच एक रेडा जमावाच्या दिशेने उधळला. उधळलेल्या रेड्याने गर्दीतल्या अनेकांना धडक दिली. यात अनेक जण जखमी झालेत... दरम्यान या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र याप्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्य़ात आलेला नाही
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
बातम्या
कोल्हापूर
Advertisement
Advertisement




















