Youtuber Video: अन् बघता बघता युट्यूबर रिल्सच्या नादात धबधब्यात गेला वाहून; अवघ्या काही सेकंदात दोस्त गायब झाल्याने मित्रांचा एकच आक्रोश
Youtuber Video: तो त्याच्या यूट्यूब चॅनेलसाठी पर्यटन स्थळांचे व्हिडिओ-रील शूट करत असे. त्याने धबधब्याचे ड्रोन शॉट सेट केले. त्यानंतर सागर पाण्यात उतरला.

Youtuber Video: ओडिशातील कोरापूट जिल्ह्यातील दुदुमा धबधब्यावर रील शूट करण्यासाठी गेलेला एक तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. 22 वर्षीय सागर टुडू हा युट्यूबर होता. तो गंजम जिल्ह्यातील बेरहमपूरचा रहिवासी होता. ही घटना रविवारी दुपारी घडली. सागर त्याचा मित्र अभिजीत बेहेरासोबत धबधब्यावर पोहोचला होता. तो त्याच्या यूट्यूब चॅनेलसाठी पर्यटन स्थळांचे व्हिडिओ-रील शूट करत असे. त्याने धबधब्याचे ड्रोन शॉट सेट केले. त्यानंतर सागर पाण्यात उतरला.
A young life, wasted casually in the guise of receiving ‘social media validation’
— Simran (@SimranBabbar_05) August 24, 2025
Videos captured from Odisha, where a man stuck amidst the heavy water flow at the #DudumaWaterfalls
22-year-old #youtuber died after he was swept away in the heavy flood waters pic.twitter.com/WiVPqebPsb
मोठ्या दगडावर उभा होता, तेव्हा धबधब्याचा प्रवाह तीव्र झाला
सागर एका मोठ्या दगडावर उभा होता, तेव्हा धबधब्याचा प्रवाह तीव्र झाला. परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने मच्छकुंडा धरण प्राधिकरणाने येथे पाणी सोडले होते. यासाठी अलर्ट देखील जारी करण्यात आला होता. जोरदार प्रवाहामुळे सागर तिथेच अडकला. सागरचा मित्र आणि किनाऱ्यावर उभे असलेले इतर लोक त्याला वाचवण्यासाठी दोरी घेऊन पोहोचले, परंतु तोपर्यंत सागर जोरदार प्रवाहात वाहून गेला. ही संपूर्ण घटना मोबाईल व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाली. काही सेकंदातच सागर पाण्यात गायब झाला. माचकुंडा पोलिसांनी सांगितले की, पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक सागरचा शोध घेत आहेत.
गर्भवती पत्नीची गळा दाबून हत्या
दरम्यान, हैदराबादजवळील मेडीपल्ली येथे एका 27 वर्षीय पतीने आपल्या गर्भवती पत्नीचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र रेड्डी याने स्वाती उर्फ ज्योती (21 वर्षीय) हिचा मृतदेह लपवण्यासाठी ब्लेडने तुकडे केला. महेंद्रने मुसी नदीत डोके, हात आणि पाय फेकून दिले. धड घरातच ठेवलेले आढळले. रविवारी पोलिसांना घरातून काही भाग सापडला आणि उर्वरित भागांचा शोध मुसी नदीत सुरू आहे. ही घटना शनिवारी घडली. दोघांमध्ये बराच काळ घरगुती वाद सुरू होता. शनिवारी पत्नीने माहेरी जाण्याचा आग्रह धरल्याने दोघांमध्ये भांडण झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे आणि डीएनए चाचणी देखील केली जाईल. 22 ऑगस्ट रोजी नोएडामध्ये हुंड्यासाठी एका पतीने आपल्या पत्नीला मुलासमोर जिवंत जाळल्याची घटना चर्चेत असताना ही घटना घडली. या महिलेचे 9 वर्षांपूर्वी लग्न झाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या























