एक्स्प्लोर

Gopichand Padalkar : माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे, पण धर्मांतराबाबत चुकीच्या गोष्टीला विरोध करणारच; गोपीचंद पडळकरांनी ठणकावून सांगितलं

Gopichand Padalkar : एकीकडे सर्वधर्म समभाव म्हणायचे मग हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतरण का केले जातेय? असा सवाल देखील गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलाय.

Gopichand Padalkar : माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे. सेवाभाव दाखवून धर्मांतराच्या बाबतीत चुकीच्या गोष्टीला विरोध करत राहू, असे वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केले आहे. सांगलीत बाळासाहेब गलगले फाउंडेशनच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांना 'धर्मरक्षक' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमातून ते बोलत होते. 

गोपीचंद पडळकर म्हणाले की, ख्रिश्चन समाजाने राज्यभर माझ्या विरोधात मोर्चे काढून माझी आमदारकी गेली पाहिजे अशी मागणी केली. मला याबाबतीत मुंबई हायकोर्टाची नोटीस देखील आलीय. पण तुम्ही गाव गाड्यातील गरीब लोकांना सेवाभाव दाखवून धर्मांतराच्या बाबतीत ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. त्याला आम्ही विरोध करत राहू. भले माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे. मला याच्याशी काही देणेघेणे नाही, असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठणकावून सांगितले. 

हिंदूंवर अन्याय होत असेल तर... 

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, आजही समाजात मुघल प्रवृत्तीची लोक आहेत आणि त्यांना आपण ठेचून काढायचे आहे. एकीकडे सर्वधर्म समभाव म्हणायचे मग हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतरण का केले जातेय, असा माझा प्रश्न आहे. पण हिंदूंवर जर कुठे अन्याय होत असेल तर त्याबाबत मी नेहमी आक्रमक भूमिका घेणार असे देखील त्यांनी यावेळी म्हटले. 

गोपीचंद पडळकरांचा सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल 

दरम्यान, मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो, मग तुम्हाला अडचण काय आहे? असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. या कार्यक्रमातून गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. माझ्या पांडुरंगाला मटण चालते असे एक विधान आले. मात्र, आमच्या पांडुरंगाला तर मटण चालत नाही. ज्या देवाला मटण चालतेय असा तुमचा कोणता देव आहे. मग तो मशिदीत असावा आणि त्यांचा तो देव असावा, त्याला ते देव मानत असतील किंवा त्या देवाला मटण चालत असेल. आज वारकऱ्यांच्या मनाच्या खच्चीकरणासाठी अशी विधाने केली जात आहेत का? आज मताच्या राजकारणासाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा नेम नाही, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळेंवर केला आहे. 

आणखी वाचा 

Jayant Patil On Gopichand Padalkar: स्वत:च्या गावात नव्हे, दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात, हे शंकास्पद; जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर निशाणा

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
सर्वपक्षीय जिव्हाळा हेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग, मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
Embed widget