एक्स्प्लोर
Jalna Crime: मुलीची छेड काढली, वडिलांनी विरोध करताच वाळू तस्कराचं कुटुंब तुटून पडलं, जालना हादरलं
Jalna Crime news: जालन्यात एका मुलीच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. निधोना रोडवरील प्रकार.
Jalna Crime news
1/7

मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळे शेजारी राहणाऱ्या तरुणासह वाळू तस्करी करणाऱ्या त्याच्या साथीदारांकडून मुलीच्या वडिलांना आणि घरातील इतर सदस्यांना मारहाण करण्यात आली.
2/7

जालना शहरातील अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
3/7

जालना शहरातील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी येथे ही घटना घडली. मुलीच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण
4/7

मुलीच्या वडिलांकडून दिलेल्या तक्रारीनुसार नऊ आरोपींविरोधात रात्री उशिरा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.
5/7

आरोपी विरोधात चंदंनजिरा पोलीस ठाण्यात मारहाण तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
6/7

याप्रकरणी पोलिसांनी वाळू तस्करीतील आरोपी असलेल्या सचिन पठाडे आणि गणेश काकडे या दोन आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपी फरार आहेत.
7/7

मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधा मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published at : 04 Jul 2025 12:30 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा

















