एक्स्प्लोर
Jalgaon Ed Raid : राजमल लखीचंद कारवाईबद्दल मोठी बातमी, एकूण 24 कोटी 70 लाखांचे दागिने जप्त
ईडीनं गेल्या तीन दिवसात राजमल लखीचंद समूहाशी निगडित 13 ठिकाणांची झडती घेतली. या कारवाईमध्ये 24 कोटी ७० लाख रुपयांचे 39 किलो सोनं, हिऱ्यांचे दागिने, आणि 1.11 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. तसंच, राजमल लखीचंद ग्रुपच्या ६० मालमत्तांचा तपशीलही ईडीनं गोळा केला आहे. या मालमत्तांची एकूण किंमत ५० कोटींहून अधिक आहे. एवढंच नाही तर मनीष जैन यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या एका रिअल इस्टेट कंपनीत लक्संबर्ग स्थित कंपनीकडून ५ कोटी युरोचा एफडीआय प्रस्ताव देखील आढळून आला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत


















