UP Election 2022 : यूपीत मतदान केंद्रांवर माकडांचा उच्छाद ABP Majha
माकडांचा उच्छाद आपण नेहमी पाहतो. मात्र हाच उच्छाद यूपीतल्या मतदान केंद्रांपर्यंत पोहोचलाय. मतदान केंद्रांवरील सीसीटीव्हीही माकडांनी तोडून टाकलेत. ईव्हीएम मशीनलाही माकडं नुकसान पोहचवू लागले आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांची सुरक्षा करणे कठिण झाले आहे. बरं माकडांचा हा उच्छाद एक-दोन नव्हे तर चक्क १५० मतदान केंद्रावर सुरु झालाय. ४ दिवसांपूर्वी माकडांनी मतदान केंद्रांवरील ४० कॅमेरे तोडून टाकले होते. त्यामुळे निवडणुक आयोगाने माकडांना पळवण्यासाठी चक्क २ लंगूर तैनात केलेत. ही घटना घडलीय उत्तर प्रदेशच्या पिलीभीतमध्ये. लंगूर माकडांना पळवून लावत असल्याने मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.



















