surat diamond bourse : सूरत डायमंड बुर्सच्या 135 कार्यालयांचं अनौपचारिक उद्घाटन
surat diamond bourse : सूरत डायमंड बुर्सच्या 135 कार्यालयांचं अनौपचारिक उद्घाटन सूरत डायमंड बुर्सच्या 135 कार्यालयांचं अनौपचारिक उद्घाटन करण्यात आलं.. 135 हिरे व्यापाऱ्यांपैकी 26 व्यापारी मुंबईतून कायमस्वरूपी कार्यालये बंद करून सुरतला स्थलांतरित झालेत. 17 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी डायमंड बाजाराचे औपचारिक उद्घाटन करणार आहेत.
सूरतमधील डायमंड बुर्स हा पंतप्रधान मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सूरतच्या डायमंड बुर्समध्ये एकूण 983 कार्यालयं आहेत. सूरत डायमंड बाजारामध्ये व्यापार सुरू करण्यापूर्वी SBI ने 20 नोव्हेंबरला डायमंड बाजारामध्ये एका शाखेचं उद्घाटन केलं आता पुढच्या महिन्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन होणार आहे.























