Ajit Singh Death : राष्ट्रीय लोक दलाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचं कोरोनामुळं निधन
Ajit Singh Death : राष्ट्रीय लोक दलाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोक दलाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे कोरोनाची लागण झाल्याने निधन झालं आहे. ते 82 वर्षाचे होते. अजित सिंह यांना 20 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. मंगळवारी रात्री अचानक तब्बेत बिघडल्याने त्यांना गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख असलेले अजित सिंह हे पश्चिम उत्तर प्रदेशचे महत्वाचे नेते होते. त्यांना फुफ्फुसाचे इन्फेक्शन झाल्याने रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. अजित सिंह यांचे पुत्र आणि माजी खासदार जयंत चौधरी यांनी त्यांच्या निधनाची वार्ता दिली आहे.





















