(Source: ECI | ABP NEWS)
PM Narendra Modi Ayodhya Visit : दिवाळीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल
दिवाळीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत पंतप्रधान मोदींनी श्री रामजन्मभूमीत मंदिराच्या निर्माण कार्याची पाहणी केली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पूजेचं रामललाची आरती करण्यात आलीय. आता थोड्याच वेळात मोदींच्या हस्ते भव्य दीपोत्सव सोहळ्याला सुरुवात होईल. पंतप्रधान मोदी शरयू नदीच्या नवीन घाटावर आरती तसेच 3-डी होलोग्राफिक प्रोजेक्शन मॅपिंग शो देखील पाहतील. यावर्षी दीपोत्सवाच्या सहाव्या आवृत्तीचे आयोजन केले जात असून, या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान स्वत: अयोध्येत येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या विशेष प्रसंगी 15 लाखाहून अधिक दिव्यांनी अयोध्या प्रकाशमान होणार आहे.
























