Time Magazines 2020 | जगातील प्रभावशाली 100 लोकांमध्ये पंतप्रधान मोदी यांचा समावेश
टाईम मॅगझिननं जगभरातील सर्वात प्रभावशाली 100 लोकांची लोकांची लिस्ट घोषित केली आहे. या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता आयुष्मान खुराणासह पाच भारतीयांनी स्थान मिळवलं आहे. सोबतच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, लंडनमधील एचआयव्हीवर संशोधन करणारे भारतीय वंशाचे डॉक्टर रवींद्र गुप्ता आणि शाहीन बाग आंदोलनातून चर्चेत आलेल्या बिल्किस दादीचं नाव देखील या यादीत आलं आहे. हे सर्व लोकं या वर्षी जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले आहेत.
टाईम मॅगझिननं पंतप्रधान मोदी यांच्याविषयी लिहिलं आहे की, लोकशाहीसाठी स्वतंत्र निवडणुकाच सर्वात आवश्यक नाहीत. यामध्ये केवळ कोणाला अधिक मतं मिळाली याची माहिती मिळते. यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण त्या लोकांचा अधिकार आहे, ज्यांनी विजेत्याला मत दिलं नाही. भारत गेल्या सात दशकांपासून सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारताच्या लोकसंख्येत अनेक धर्मांच्या लोकांचा समावेश आहे, असं म्हटलं आहे.