Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल
संसदेत घुसखोरी करणाऱ्या चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची माहिती
संसद भवनात गोंधळ माजवण्याच्या उद्देशानं 4 नव्हे तर 5 जण आले होते, असा दिल्ली पोलिसांना संशय आहे. ललित झा असं या व्यक्तीचं नाव आहे. तो सध्या फरार आहे. अमोल शिंदे आणि नीलम सिंह जेव्हा संसदेबाहेर स्मोक कँडल फवारत होते, तेव्हा ललित त्यांचा व्हिडीओ काढत होता. अमोल आणि नीलमला पकडल्यावर ललित तिथून पळून गेला, असा पोलिसांना संशय आहे. या चौघांचे फोन ललितकडे आहेत. दिल्ली पोलीस त्याचा कसून शोध घेतायेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पाच जणांचा मास्टरमाईंड कुणीतरी वेगळाच आहे, ही सहावी व्यक्ती या पाच जणांना रसद पुरवत होती, असाही पोलिसांना संशय आहे. संसदेतील घुसखोरी प्रकरणात उशीराने आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विकी शर्मा आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी गुडगावमधून ताब्यात घेतलंय. गुडगावमधील शर्मा दाम्पत्याच्या घरी चौघे आरोपी थांबले होते.