Union Budget Session संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुुरुवात, Nirmala Sitaraman सादर करणार
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे.... मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण 66 दिवसांचं असून ते दोन टप्प्यात चालणार आहे. पहिल्या टप्प्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात वित्त विधेयक मंजूर होईल. आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवतील. तर उद्या अर्थमंत्री 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10.30 वाजता संबोधित करण्याची शक्यता आहे.