Night-time Luminosity in India : मागील 10 वर्षांत कसा उजळला भारत, सॅटलाईटद्वारे साफ दिसत आहेत बदल
Night-time Luminosity in India : भारताचा यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी एक दिवस केवळ शिल्लक आहे. त्याआधी 2021-22 सालच्या इकोनॉमिक सर्व्हेचं सादरीकरण मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी केलं. यावेळी बजेटबाबतच्या माहितीसह भारताने मागील 10 वर्षांत केलेल्या विकासाबाबतही सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे यावेळी भारतात झालेल्या प्रगतशील बदलांचे सॅटलाईटच्या मदतीने घेतलेली चित्रंही सादर करण्यात आली. यात भारतात 2012 आणि 2021 या वर्षांत बदलणाऱ्या नाईट लाईफमुळे झालेली झगमगही थेट दिसून येत आहे. यामुळे भारताने या 10 वर्षांत केलेला विकास आणि बदललेली नाईट लाईफ थेट कळून येत आहे. या सादरीकरणातील उजळलेला भारत पाहण्याजोगा आहे.























