एक्स्प्लोर
Bachchan Family | बच्चन कुटुंबाला कोरोनाचा विळखा; जलसा बंगला सील, तर पालिकेकडून सॅनिटायझेशन
बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जया बच्चन यांची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे. अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. काल रात्री बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना आता होम क्वॉरंटाईन करण्याची शक्यता आहे. यानंतर आता बच्चन कुटुंबियांकडे काम करणाऱ्या 28 जणांना जलसा,जनक बंगल्यात तळमजल्यावर क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















