एक्स्प्लोर
M K Stalin On Raj - Uddhav Thackeray | ठाकरे बंधूंच्या एकीचे MK Stalin यांनी केले स्वागत
हिंदीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी स्वागत केले आहे. भाषिक अधिकारांसाठीचा लढा आता राज्यांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात वेगानं पसरतोय असे एम के स्टॅलिन यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार तामिळनाडूमध्येही तमिळ आणि इंग्रजी या दोन भाषांच्या जागी त्रिभाषा धोरणाद्वारे हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहे, असे एम के स्टॅलिन यांनी नमूद केले. त्यामुळे काल ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेला देशभरात एक महत्त्वाचा चर्चेचा विषय ठरलेला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी या भूमिकेचे स्वागत केले आहे. भाषिक अधिकारांच्या संरक्षणासाठी विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील या घडामोडींमुळे राष्ट्रीय स्तरावर भाषिक धोरणांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















