Gyanvapi Mosque Case : ज्ञानवापीतील भिंत पाडण्याच्या मागणीवर आज कोर्टात सुनावणी ABP Majha
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेनंतर सुरु झालेल्या वादावर आज वाराणसीच्या कोर्टात सुनावणी होणार आहे. मशिदीत शिवलिंग आढळल्याचा दावा हिंदू पक्षानं केल्यानंतर कोर्टाच्या आदेशानं तिथली जागा सील करण्यात आलीय. आता मशिदीतील नंदीच्या समोरची भिंत तोडून त्या जागेचा सर्व्हे केला जावा या मागणी हिंदू पक्षानं केलीय. त्यावर आज सुनावणी होणार आहे. सील केलेल्या तलावातील माशांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे त्यावरही आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, शिवलिंग मिळाल्याचा दावा केलेली जागा संरक्षित ठेवण्याचे आदेश काल सर्वोच्च न्यायालयानं दिले. वाराणसीच्या कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासही सुप्रीम कोर्टानं नकार दिला. पण ज्ञानवापीत नमाज पठणाला बंदी नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.






















